पुणे : अंगणवाडी सेविकांचा पालकमंत्र्याच्या कार्यालयावर मोर्चा 

पुणे – अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी तसेच भाऊबीज भत्ता जादा मिळावा या तसेच इतर विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.या आंदोलनात शेकडो सेविका सहभागी झाल्या होत्या.पावसात ही अनेक अंगणवाडी सेविका या आंदोलानात उपस्थित होत्या.
तत्पुर्वी सेविकांच्यावतने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरवात जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली त्यानंतर हा मोर्चा नरपतगिरी चौक ,15 ऑगस्ट चौक मार्गे अपोलो टॉकीज दारुवाला पुल मार्गे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपती कार्यालयासमोर आला.याठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले व सेविकांच्यावतीने मागण्याचें निवेदन देण्यात आले.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याबरोबर आहाराच्या दरात वाढ टीएचआरची सक्ती करण्यात यावी अशाही कामही मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्‍न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले जाते पण ते प्रश्‍न सोडविले जात नाहीत त्यामुळेच अंगणवाडी सेविकांच्यावतीने राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.त्या पार्श्‍वभुमीवर आज पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढण्यात आला.

(सर्व छायाचित्रे : सूर्यकांत गावडे)

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)