पुणेकरांनी अनुभवला वाघांचा ‘सत्तासंघर्ष’

‘क्‍लॅश ऑफ टायगर्स’ चित्रपटाचे प्रदर्शन


राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, वनविभाचा उपक्रम

पुणे – “टेरिटोरिअल अॅनिमल’ अशी ओळख असलेल्या वाघांमध्ये हद्दीचा वाद नेहमीच उद्‌भवतो. त्यातूनच त्यांच्यामध्ये अनेक लढायादेखील होतात. जीवघेण्या लढाईतून जो जिंकतो, तोच वरचढ ठरतो आणि अधिराज्य गाजवतो. एकमेकींच्या बहिणी असलेल्या दोन वाघांमधील असाच एक “सत्तासंघर्ष’ पुणेकरांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहण्यास मिळाला. निमित्त होते, “क्‍लॅश ऑफ टायगर्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, वनविभाग आणि नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑफ या नल्ला मुथ्थू’ निर्मित वाघांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुथ्थू यांनी वाघांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. यावेळी लीला पूनावाला, एअरमार्शल भूषण गोखले (नि.), गायक पं. संजीव अभ्यंकर, सुनील लिमये, पुणे रेल्वे विभागाचे मिलिंद देऊस्कर, जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर, अभिनेता मोहन आगाशे, अनुज खरे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा चित्रपट पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. यावेळी मुथ्थु म्हणाले, “जगभरातील वाघांपैकी सुमारे 70 टक्के वाघ आपल्याकडे आहेत, असे बोलले जाते. वाघांच्या आयुष्यावर चित्रीकरण करणे हे जितके थरारक आहे, तितकेच आव्हानात्मकदेखील आहे. या चित्रपटासाठी देखील मी सुमारे दोन वर्षे काम केले आहे. एकाच कॅमेराचा वापर करून विविध दृश्‍ये साकारणे हे अवघड काम आहे. मात्र, हे आव्हान स्वीकारून हा चित्रपट केला आणि तो आज तुमच्यासमोर सादर होतोय, याचा अतिशय आनंद वाटत आहे. आगामी काळात ताडोबा अभयारण्यातील “माया’ वाघिणीवरदेखील चित्रपट बनवणार आहे.’

डॉ. प्रगती अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अनुज खरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)