पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही

जिल्हाधिकारी, आयुक्‍तांचा विश्‍वास 


व्यवस्थापन करून पाण्याची बचत होणार


शहर, जिल्ह्यातील सर्व नागरिक पुणेकरच


‘पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा’वर वार्तालाप

पुणे – ग्रामीण भाग, महापालिका हद्द आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) मधील नागरिक हे सर्व पुणेकरच आहेत. पाण्यावर सर्वांचा अधिकार असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. समान पाणीपुरवठा योजनेतून वाचणारे पाणी तसेच व्यवस्थापन करून पुढील तीन वर्षांत पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भाग, शहर आणि प्राधिकरण हद्दीतील सर्व नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यासाठी पुण्याचे पाणी कमी होणार नाही, असा विश्‍वास जिल्हाधिकारी सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार आणि प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी व्यक्त केला. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे “पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा’ या विषयावर वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी या अधिकाऱ्यांनी सुरू असलेले प्रकल्प, हाती घेतलेली विकास कामे आणि पुढील 30 वर्षाचा विचार करून करण्यात येणारे नियोजन आदींची माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)