पुणेकरांनाही ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’

महामेट्रोची सुविधा : एकाच कार्डवरून सर्व प्रकारच्या सेवांद्वारे प्रवास


महामेट्रो, रेल्वे आणि पीएमपीचे एकत्रीकरण होणार


सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पाऊल


रोख पैसे बाळगून प्रवास, रांगेत थांबण्याची कटकट थांबणार

पुणे – शहरातील सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधेसाठी महामेट्रोकडून प्रवाशांना कॉमन मोबेलिटी कार्ड दिले जाणार आहे. या कार्डमुळे मेट्रोसह, मेट्रो स्थानक परिसरातील “फिडर’ वाहतूक सेवांसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे कोणतीही रोख रक्कम न वापरता नागरिकांना या कार्डच्या माध्यमातून सलग प्रवास करता येणे शक्‍य होणार आहे.

महामेट्रोकडून मेट्रो मार्गासह, शहरात ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना एकाच ठिकाणी एसटी, पीएमपी, रेल्वे, रिक्षा तसेच वाहतुकीचे इतर पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय, मेट्रो स्थानकापर्यंत नागरिकांनी पोहचावे यासाठी “फिडर’ सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. य्तामुळे रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानक,व्यावसायिक क्षेत्र तसेच जास्तीतजास्त नवीन आणि जुन्या वस्तींना बससेवा, ई-रिक्षा, ऑटो, टॅक्‍सी व मो-बाईकच्या माध्यमातून मेट्रोचे प्रवासी सहज जवळील स्टेशनपर्यंत ये-जा करू शकतील. त्यासाठी नागरिकांना प्रत्येक वेळी रांगेत उभे राहून अथवा वेगवेगळे तिकीट काढावे लागू नये, या उद्देशाने “कॉमन मोबिलिटी कार्ड’ची सेवा नागरिकांना उपल्बध करून देणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी महामेट्रो, रेल्वे आणि पीएमपीचे या कार्डद्वारे एकत्रीकरण केले जाईल. कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच ही एक अभिनव संकल्पना आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्पेसिफिकेशनच्या आधारावर हे कार्ड येईल याद्वारे कुठेही न थांबता प्रवास करता येणार आहे. घरापासून ते मेट्रो स्टेशन आणि परत मेट्रो स्टेशन ते ऑफिसपर्यंत उपयोगात येणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी या कार्डचा वापर होईल. जसे ऑटो, मोबाइक, बस आणि मेट्रो याठिकाणी कार्ड स्वाईप करून प्रवासी आपले तिकीट शुल्क मोजू शकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)