पुणेकरांच्या जिभेवर ‘किन्नू’चा गोडवा

आवक वाढली, भावही घसरले : पिंपरी-चिंचवडमध्येही मागणी

पुणे – यंदा पंजाब आणि राजस्थान राज्यातून किन्नू संत्रीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मोसंबी आणि संत्र्याचा संकर असलेले लिंबूवर्गीय किन्नूची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात वाढली आहे. परिणामी, घाऊक बाजारात किन्नू संत्रीच्या भावात घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात किन्नू संत्रीला किलोस 25 ते 30 रुपये भाव मिळत आहे. दिसायला आकर्षक आणि स्वस्त असल्यामुळे या फळाला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, उपनगरांसह इतर शहरांमधून चांगली मागणी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदा पोषक हवामानामुळे किन्नू संत्र्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. सध्या गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळबाजारात पंजाब आणि राजस्थान येथून दररोज सुमारे 40 ते 50 टन आवक किन्नू संत्रीची आवक होत आहे. मंगळवारी (दि.1) सुमारे 50 ते 60 टन इतकी आवक झाली. घाऊक बाजारात 20 किलोच्या कॅरेटला फळाच्या दर्जानुसार 500 ते 600 रुपये तर, किलोस 25 ते 30 रुपये भाव मिळत आहे. या फळाला पुणे शहर पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, लोणावळा, कोकण, वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी, पेन, पनवेल आदी भागातून मोठी मागणी आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील किन्नू संत्रीचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

मोरे म्हणाले, “डिसेंबरपासून किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू झाला आहे. तो साधारणपणे मार्चपर्यंत सुरू असतो. यंदा पोषक हवामानामुळे किन्नू संत्रीचे उत्पादन वाढले असून बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. हंगामाच्या सुरूवातीला या संत्रीची चव आंबट गोड होती. ती आता अधिक गोड झाली आहे. आता फळाचा आकार, गोडी आणि दर्जा सुधारला आहे. किरकोळ ग्राहक, फळविक्रेते तसेच ज्यूस विक्रेत्यांकडूनही या संत्र्याला चांगली मागणी आहे. पुढील काळात आवक वाढल्यास भाव आणखी उतरण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)