#Video पुणेकरांचे हाल पोलीस झाले मालामाल : हेल्मेटसक्ती विरोधात आंदोलन

पुणे – हेल्मेट वापरा सुरक्षेसाठी, आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशाप्रकारे हेल्मेट वापराचे संदेश एकिकडे वाहूतक पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली गेली तर दुसरीकडे  शहरात नववर्षापासून हेल्मेटसक्तीच्या कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. यानंतर नेहमीप्रमाणे काही लोकांकडून याला विरोध सुरु झाला आहे. हेल्मेटसक्ती रद्द करावी अशा मागणीचे  निवेदन आंदोलक पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना देणार आहेत. पत्रकार संघ ते पुणे पोलीस आयुक्तालय अशी ही रॅली आहे.

दरम्यान, हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने पुण्यात आज सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येत आहे. हेल्मेटसक्ती कृती विरोधी समिती आणि पुणेकरांनी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला आहे. हेल्मेट न घालता वेगवेगळ्या पगड्या घालून दुचाकीस्वार आंदोलनात सहभागी झाले आहेत. हेल्मेटसक्ती रद्द करावी अशा मागणीचे  निवेदन आंदोलक पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांना देणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)