पुणेकरांकडून नववर्षाचे जल्लोषात स्वागत

पुणे – नववर्षाचे स्वागत शहरात जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आले. त्यानिमित्त शहरातील हॉटेल आणि क्‍लबमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. तर, डेक्‍कन, लष्कर परिसर, कोरेगाव पार्क आदी ठिकाणी कुटुंब आणि मित्र मंडळींनी एकत्र येऊन नवीन वर्षाचा आनंद लुटला. यामुळे या परिसरात रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी काही ठिकाणची वाहतूकही दुसरीकडे वळविली होती. दरम्यान, नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहास कोणतीही दुर्घटना होऊन गालबोट लागू नये यासाठी तब्बल सहा हजार पोलिसांचा खडा पहारा पहाटेपर्यंत होता. तर, वाहतूक शाखेनेही “ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम राबवून मद्यपींवर ठिकठिकाणी कारवाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)