पुढील 15 वर्षे मोदींचीच हवा : आठवले

निवडणुकीत एनडीएला 400 च्या वर जागा मिळण्याचा दावा

सातारा – संपूर्ण भारतात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आहे. पुढील पंधरा वर्षात त्यांचीच हवा रहाणार आहे. राहुल गांधी, आणि शरद पवार यांनी कितीही विरोधकांना एकत्र घेवून मोदींविरोधात मोट बांधली तरी त्याचा काही फरक पडणार नाही. त्यामुळे माझा निर्णय बदलला जाणार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या एनडीए आघाडीला 400 च्या वर जागा मिळतील असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सातारा येथे विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परीषदेत केला. दरम्यान महाराष्ट्रात लोकसभेला भाजप-शिवसेना युतीची बोलणी सुरू आहे. उध्दव ठाकरेंना भाजप बरोबर युती करणे फायदेशीर ठरेल असा दावा ना. आठवले यांन केला.

कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनी मोदी विरोधी आघाडी केली असली तरी त्याचा फायदा कॉंग्रेसला होणार नाही. गेल्यावेळी भाजप 282 जागा मिळाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीला जागा वाढलेल्या दिसतील, शिवसेनेला भाजप बरोबर युती करणे फायदेशीर ठरणार आहे. दोन्ही पक्षाची मतांची आडेवारी वाढली आहे. जवळपास 45 जागा मिळतील. जर का? शिवसेनेने युती केली नाहीतर शिवसेनेचा तोटा होईल. शिवसेनेसोबत युती न करता राज्यात भाजप, आरपीआय आघाडीला 33 जागा मिळतील असे सांगून ना. आठवले म्हणाले आपल्याला हवेचा अंदाज आपल्याला चांगला कळतो. म्हणून आत्ताही सांगतो की, अजून 10 ते 15 वर्षे देशभर मोदींचीच हवा रहाणार आहे.

प्रसार माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून बातम्या केल्या. 15 वर्षे मोदिंची हवा रहाणार असल्याने मी निर्णय बदलणार नाही. भाजप एनडीए सोबतच आरपीआय रहणार आहे. वंचित आघाडीची स्थापना केली असली तरी त्याचा भाजपला पॉझेटीव्हच फायदा होणार आहे. कारण नाराज दलित व मुस्लिमांची नाराज जाणारी मते कॉंग्रेसला मिळणार नाहीत. वंचित आघाडीला मते मिळणार नाहीत. बहुजन वंचित आघाडी ही वंचितांना सस्तेपासून दूर ठेवणारी आघाडी आहे. सत्ता हवी असेल तर त्या आघाडीने भाजप आघाडीबरोबर यावे असे सांगून ना. रामदास आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर मी भाजपसोबत राहिलो तर दलितांची ताकत वाढण्यास मदत होईल. बहुजन वंचित आघाडीचा एमआयएम बरोबर झालेल्या आघाडीचा भाजपला चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे बहुजन वचिंत आघाडीची चिंता आम्हाला अजिबात नाही.

आरक्षणासाठी कायदा हवा
दलितांचे आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. मराठा आरक्षणाला सरकारचा व मित्र आरपीआयचाही पाठींबा आहे. 1 डिसेंबरला मराठा आरक्षणाचा निर्णय जाहिर करीत आहोत. अशी भुमिका मुख्यमंत्र्यांनी जाहिर केली आहे. पण त्यामध्ये माझ व्यक्तीगत माझ असे आहे की, संसदेने कायदा केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. राज्यसरकारने निर्णय घेतला असला तरी पुन्हा मराठा आरक्षण न्यायालयात गेल्यानंतर अडचणी निर्माण होवू नयेत. मराठा समाजाला अर्थिक निकष लावून लाभ द्यावा. ज्यांचे 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे, अशांना नोकरी व शिक्षणामध्ये 25 टक्के आरक्षण देण्याचा कायदा हा संसदेने करावा. येणाऱ्या अधिवेशात मी हा मुद्दा मांडणार आहे. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फुटाचा पुतळा उभा रहणार आहे. नरेंद्र मोदींच्या काळात देशातील डॉ. बाबासाहेबांची सर्व स्मारके पूर्ण होतील असेही आठवले म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)