पुढील रामनवमीपर्यंत राम मंदिर उभारा अन्यथा आत्मदहन करेन-वेदांती

फैजाबाद : राम जन्मभूमी न्यासाचे सदस्य डॉक्टर रामविलास वेदांती यांनी एक धक्कादायक घोषणा केली आहे. पुढील रामनवमीपर्यंत मंदिराची उभारणी न झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

मागील 15 वर्षांपासून रामजन्मोत्सवादरम्यान 9 दिवसांची रामकथा सांगत आलो आहे. रामभक्तांना रामकथा ऐकवित असताना लवकरच राम मंदिर उभारले जाईल, असे आश्वासन देत राहिलो. हे आश्वासन ऐकत जनतेने 15 वर्षे प्रतीक्षेत काढली. यंदा मात्र लोकांनी मंदिराची उभारणी कधी होणार अशी विचारणा केल्याचा दावा वेदांती यांनी केला. सध्या 21 राज्यांमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार स्थापन होऊन वर्षे उलटले तरीही मंदिराचे नाव कोणी घेत नसल्याचे वेदांती यांनी यावेळी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)