पुढील महिन्यात सीमेवर पाकिस्तानशी मर्यादित स्वरूपाचा संघर्ष?

बीएसएफकडून संकेत
जम्मू – पुढील महिन्यात (एप्रिल) जम्मू-काश्‍मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) पाकिस्तानशी मर्यादित स्वरूपाचा संघर्ष होण्याचे संकेत भारतीय सीमा सुरक्षा दलाकडूून (बीएसएफ) देण्यात आले आहेत. संभाव्य संघर्षासाठी पूर्ण सज्ज असल्याचेही बीएसएफने म्हटले आहे.

दरवर्षी एप्रिल महिन्यात पिकांच्या कापणीचा हंगाम संपल्यानंतर पाकिस्तानशी मर्यादित संघर्ष होतो. यंदाही तसे घडण्याची शक्‍यता आहे. संघर्ष होऊ नये अशी आमची इच्छा आहे. मात्र, आम्हाला तयारीत रहावे लागेल, असे बीएसएफचे महासंचालक के.के.शर्मा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तान भारतीय हद्दीत मारा करतो. या माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. पाकिस्तानशी होणारा संभाव्य मर्यादित स्वरूपाचा संघर्ष शस्त्रसंधी उल्लंघनासंदर्भातच आहे.

दरम्यान, मागील काही काळात घुसखोरीचे अनेक डाव उधळण्यात आल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले. सीमेपलिकडे दहशतवाद्यांचे अड्डे असल्याची माहिती आम्हाला सातत्याने मिळते. आयबीजवळ दहशतवाद्यांचे गट येत असल्याचे अनेक आढळून आले. बीएसएफ सतर्क असल्याने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे डाव उधळले गेले आणि त्यांना माघारी परतावे लागले. मागील तीन महिन्यांत घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले. अशा प्रयत्नांना पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्या रेंजर्सचा (सीमेवर तैनात सैनिक) पाठिंबा असतो ही बाब उघड गुपित आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानकडून इन्कार केला जातो. मात्र, पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्सच्या सक्रिय मदतीशिवाय घुसखोरी घडू शकत नाही, अशी रोखठोक भूमिकाही शर्मा यांनी मांडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)