पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका

विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता

पुणे –
राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका कायम असून विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यात सर्वात कमी अहमदनगर येथे 9.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून, पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. काही भागांत ढगाळ वातावरण असेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

कोकण-गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट झाली आहे. तर, राज्याच्या उर्वरीत भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील काही भागांत थंडीची लाट आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, महाबळेश्‍वर, जळगाव, सोलापूर, नाशिक या भागांतही थंडीने हुडहुडी भरली आहे. दरम्यान, पुणे शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शनिवारी (दि.12) शहरातील किमान तापमान 10.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. पुढील दोन दिवस शहरातील थंडी कायम राहील. तसेच सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)