पुढील आठवड्यापासून मिळणार अकरावीच्या माहितीपुस्तिका

एक लाख पुस्तिकांची छपाई पूर्ण : महाविद्यालयीन नोंदणीही होणार सुरू
पुणे – अकरावी प्रवेशासाठी यंदा एक लाख माहितीपुस्तिकांची छपाई झाली असून पुढील आठवड्यापासून शाळांमध्ये माहितीपुस्तिका देण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसांतच महाविद्यालयांची या वर्षीची नोंदणीही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वर्षीची दहावी परीक्षा झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे दिव्य पालक व विद्यार्थ्यांना पार पाडावे लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी आपल्याला कोणते महाविद्यालय हवे आहे हे विद्यार्थ्यांनी आधीच ठरवून ठेवले असले तरीही प्रत्यक्षात जेव्हा प्रवेश सुरू होतील तेव्हाच त्यांना “कट ऑफ’ कळेल. मात्र, अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रवेशाची तयारी एप्रिलपासूनच सुरू केली आहे. दहावीचा निकाल साधारण जून महिन्यात लागतो, त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होते. मात्र, त्याआधी प्रवेशाची पूर्वतयारी म्हणून माहितीपुस्तिकांचे वाटप केले जाते; तसेच मुलांकडून अर्जाचा भाग एकही भरून घेतला जातो.

अकरावी प्रवेशाची तयारी आम्ही केली असून 1 लाख माहिती पुस्तिकांची छपाई केली आहे. पुढील सोमवारपासून विद्यार्थ्यांना शाळांमध्ये या माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जातील. जेणेकरून विद्यार्थी प्रवेशाविषयीची सर्व माहिती जाणून घेऊ शकेल.
– मिनाक्षी राऊत, सचिव, अकरावी केंद्रीय प्रवेश समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)