पुजारी गॅंगमधील 10 गुंडांना 5 वर्षांचा तुरूंगवास

मुंबई – कुख्यात रवी पुजारी गॅंगमधील दहा गुंडांना आज येथील विशेष न्यायालयाने प्रत्येकी पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले.

याप्रकरणी एकूण बारा आरोपींना 2014 मध्ये अटक करण्यात आली. त्यातील दोघांना आरोपमुक्त करण्यात आले. याप्रकरणी रवी पुजारीला फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुजारी परदेशी राहत असल्याचा अंदाज आहे. त्याने मुंबईत आपल्या गॅंगचा दबदबा पुन्हा निर्माण करण्याच्या उद्देशातून भट्ट किंवा त्यांचा भाऊ मुकेश किंवा मुलगा राहुलच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, दोषी ठरवण्यात आलेल्यांना मोक्काच्या आरोपामधून मात्र मुक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)