पुजारा विराटइतकाच महत्त्वाचा खेळाडू -सौरव गांगुली

कलकत्ता  – तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजारा हा भारतीय संघासाठी विराट कोहलीइतकाच महत्त्वाचा फलंदाज असून त्याच्या योगदानाकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही, असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे. “अ सेंचुरी इज नॉट इनफ’ या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी तो बोलत होता. या कार्यक्रमाला व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजन सिंग हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला.

गांगुली म्हणाला की, पुजारा भारतीय संघाचा आधारस्तंभ असून तो सध्याच्या सर्व क्रिकेट संघांमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. राहुल द्रविड भारताचा सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज असून परदेशात खेळताना पुजारा तिसऱ्या क्रमांकावर सर्वोत्कृष्ट ठरतो. पुजारा आपल्या फलंदाजीने चेंडूची चमक कमी करताना पुढच्या खेळाडूंना मोकळेपणाने फलंदाजी करण्याची संधी मिळवून देतो. त्यामुळे सध्याच्या संघात तो विराट कोहली इतकाच महत्त्वाचा फलंदाज आहे.

यावेळी गांगुलीने पुजाराची प्रशंसा करताना सांगितले की, पुजाराकडे दुर्दैवाने दुर्लक्ष झाले आहे. त्याचे कसोटी क्रिकेटमधील आकडे पाहिले असता त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे हे आपल्याला समजून येते. पुजाराने केवळ 57 कसोटी सामन्यांमध्ये 14 शतके झळकावली आहेत. पुजारा तंत्रशुद्ध फलंदाजांपैकी एक असून खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी तो पुरेसा वेळ घेतो आणि परिस्थितीनुसार फटके खेळण्यास सुरुवात करतो.

यावेळी बोलताना पुजारा म्हणाला की, माझी शैली नैसर्गिकरीत्याच कसोटी फलंदाजाची आहे आणि त्या शैलीप्रमाणेच मी खेळतो. परंतु मी आता एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटच्या गरजा ध्यानात घेऊन वेगवान खेळी साकारण्याचा, उंचावरून फटके मारण्याचा, तसेच रिव्हर्स स्वीपसारखे फटके लगावण्याचा सराव करतो आहे. त्यामुळे माझे संघातील सहकारी देखील माझ्यावर खूष असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)