पुजारा आणि कोहली हाच फरक – जस्टिन लॅंगर

मेलबर्न: मेलबर्न येथील तिसरी कसोटी हारल्यानंतर पराभवासंदर्भात एका नंतर एक वेगवेगळी कारणे देणाऱ्या पेन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनीही अशेच स्पष्टिकरण दिले आहे. त्यांच्या मते  भारतीय संघात पुजारा आणि विराट सारखे दर्जेदार फलंदाज असून सध्या ऑस्ट्रेलियन संघाकडे तशे फलंदाज नाहीत, त्यामुळे ते पराभुत होत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तिसरी कसोटी जिंकत भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून प्रथमच भारताला ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजयाची संधी निर्माण झाली आहे. भारताने मालिकेतील दोन सामने जिंकल्याने ऑस्ट्रेलियन संघाने पराभवाची अनेक कारणे द्यायला सुरूवात केली असून त्यात तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघासाठी पोषक खेळपट्टी बनवल्याचा आरोप केल्यानंतर सध्या आमच्याकडे वॉर्नर, स्मिथ आणि बॅनक्रॉफ्ट हे खेळाडू बाहेर असल्याने आमचा पराभव होत असून जर भारतीय संघातील विराट कोहली आणि चेतेश्‍वर पुजारा यांना बाहेर बसवले तर भारतही पराभुत होइल असे विधान टिम पेनने केल्यानंतर त्याला आता प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनीही आपली जोड दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना लॅंगर म्हणाले की, भारतीय संघामध्ये जागतीक दर्जाचे फलंदाज असून आमच्या कडे सध्या त्या दर्जाचे फलंदाज नाहीत त्यामुळे भारतीय संघ सध्या आमच्यावर भारी पडतो आहे. कारण तुम्ही पहाल तर, पहिल्या तिन सामन्यांमध्ये चेतेश्‍वर पुजाराने 53 च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. तर, विराट कोहलीने 46 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. हे दोन्ही फलंदाज भारतीय संघावर दडपन येऊ देत नाहीत आणि आमचे दडपण आनन्याचे सर्व प्रयत्न ते हानून पाडत आहेत. तर, दुसरी कडे आमच्या संघाकडे सध्या तश्‍या प्रकारच्या फलंदाजांची कमतरता असून हाच सध्या दोन्ही संघांमधिल मुख्यफरक आहे.

तसेच यावेळी ते पुढे म्हणाले की, सध्या ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडलेला असून सलामीवीर फलंदाज ऍरोन फिंच सध्या लईत नसून मधल्या फळीतील इतर फलंदाज देखिल आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आगामी कसोटीत आम्ही संघाला विजयी मार्गावर परतवण्यासाठी कोणत्या प्रकारची रणनिती आखता येइल याचा विचार करत आहोत असेही ते म्हणाले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)