पुंडलिकाला मारण्यासाठी कली घेणार यमाचं रुप

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिकेतून विठुरायाच्या भक्तीचा महिमा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत असते. यापुढील भागांमध्येही विठोबाच्या दिव्यत्वाची प्रचिती घेता येणार आहे. विठ्ठलाचा लाडका भक्त पुंडलिकाच्या जीवाला धोका निर्माण झालाय. पुंडलिकाला यमसदनी धाडण्याचं षडयंत्र कलीने आखलंय.

पुंडलिक विठ्ठलाचा श्रेष्ठ भक्त होऊ नये यासाठी कलीने बरेच प्रयत्न केले, पण पुंडलिकाच्या भक्तीपुढे कलीची कारस्थानं नेहमी फिकी पडली. यावेळी मात्र पुंडलिकाला धडा शिकवण्यासाठी कली यमाचं रुप धारण करणार आहे. पुंडलिकाला यमसदनी धाडण्याचा कलीचा डाव यशस्वी होणार का? विठुराया लाडक्या भक्ताचा जीव वाचवणारा का? कलीला त्याच्या कुकर्मांचं शासन मिळणार का? याची उत्तर ‘विठुमाऊली’च्या विशेष भागातून मिळणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)