पी.वाय.सी क्रीकेट क्‍लबचा शानदार विजय

पुणे – येथील पी.वाय.सी क्‍लबच्या प्रांगणात सुरु असलेल्या महराष्ट्र क्रिकेट असोसीयेशन आयोजीत साखळी सामन्यातील पहिल्या सामन्यात पी.वाय.सी क्रीकेट क्‍लबने सातारा जिल्हा क्रीडा असोसिएशनच्या संघाचा 1 डाव आणि 103 धावांनी पराभव करत शानदार विजय संपादन केला.

सातारा संघाणे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय त्यांचे वेगवान गोलंदाज भूषण गोळे आणि मनोज इंगळे यांनी सार्थ ठरवत पी.वाय.सीला सुरुवातीलाच पाच झटके दिले परंतू त्या नंतर फलंदाजीस आलेल्या मंदार भंडारी आणि करण जाधव यांनी शतकी खेळी करताना त्रीशतकी भागीदारी करत पी.वाय.सीला 376 धावां पर्यंत मजल मारुन दिली. पी.वाय.सी कडून भंडारीने 150 चेंडूत 139 धावांची खेळी केली तर जाधव याने 200 चेंडूत 155 धावा केल्या. तर साताऱ्याच्या भूषण गोळे याने 99 धावा देत 4 गड्यांना बाद केले. तर मनोज इंगळे ने 33 धवा देत 2 बळी मिळवले.

प्रत्युत्तरात 377 धावांचे आव्हाण घेऊन मैदानात उतरलेल्या सातारा संघाचा पहिला डाव केवळ 165 धावांत आटोपल्याने त्यांना फॉलोऑनचा सामना करावा लागला. 212 धावांच्या पिछाडी वरुन आपला दुसरा डाव सुरु केलेल्या सातराच्या संघाचा दुसरा डाव केवळ 108 धावांतच आटोपल्याने पी.वाय.सी क्रीकेट क्‍लबने हा सामना 1 डाव आणि 103 धावांनी जिंकला.

संक्षिप्त धावफलक – पी.वाय.सी क्रीकेट क्‍लब पहिला डाव सर्वबाद 376 ( मंदार भंडारी 139, करण जाधव 155, मनोज इंगोले 99-4) विजयी विरुद्ध सातारा पहिला डाव सर्वबाद 165 ( तेजन सपकाळ 59, अभिनव जगताप 40, संजय परदेशी 42-4) सातारा दुसरा डाव सर्वबाद 108 ( विशाल भिलारे 16, विवेक्‍ कोळगे 16, प्रितम पाटील 24-2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)