पी. चिदंबरम यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल 

एअरसेल मॅक्‍सिस मनी लॉंडरिंग प्रकरणी कार्ती आणि 9 जणांवरही आरोप 

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या विरोधात सक्‍तवसुली संचलनालयाने आज एअरसेल मॅक्‍सिस मनी लॉंडरिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केले. एअरसेल मॅक्‍सिसला विदेशातून अर्थसहाय्य मिळण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांबरोबर मिळून कारस्थान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या आरोपपत्राची निश्‍चिती करण्यासाठी विशेष न्यायाधीश ओ.पी. सैनी यांनी 26 नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्‍चित केली आहे. चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर थोड्याच वेळात “ईडी’ने चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात पहिले आरोपपत्र दाखल केले. चिदंबरम यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पी. चिदंबरम, कार्ती यांचे सी.ए. एस. भास्कररामन, एअरसेलचे माजी सीईओ व्ही. श्रीनिवासन, मॅक्‍सिसचे अधिकारी ऑगस्टस राल्फ मार्शल, ऍस्ट्रॉ ऑल एशिया नेटवर्क, पिक मलेशिया, एअरसेल टेलिव्हेंचर्स लिमिटेड, मॅक्‍सिस मोबाईल सर्व्हिसेस, बुमी अर्माडा बरहाद आदी 9 जणांची नावे या आरोपपत्रामध्ये आहेत. एअरसेल मॅक्‍सिसला चिदंबरम यांच्याकडून 2006 मध्ये “एफआयएफबी’ची मंजूरी मिळण्यासाठी 1.16 कोटी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. हे पैसे मॉरिशसमधील ग्लोबल कम्युनिकेशन ऍन्ड सर्व्हिसेस होल्डिंग लिमिटेडला देण्यात आले. त्यासाठी सरकारच्या “एफडीआय’धोरणांच्या विविध नियमांचा भंग करण्यात आला असेही या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.

चिदंबरम हे 2006 साली तत्कालिन गृहमंत्री असताना त्यांना 600 कोटी रुपयांच्याच थेट परदेशी गुंतवणूकीला परवानगी देण्याचे अधिकार होते. “ग्लोबल कम्युनिकेशन ऍन्ड सर्व्हिसेस होल्डिंग लिमिटेड’च्या थेट परदेशी गुंतवणूकीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीपुढे मांडला जायला हवा होता. मात्र तसे न होता चिदंबरम यांनी कारस्थान करून हा प्रस्ताव मंजूर करून घेतला, असे “ईडी’ने आपल्या पुरवणी आरोपपत्रामध्ये म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)