पी चिदंबरम आणि कार्ती यांना 8 ऑक्‍टोबर पर्यंत संरक्षण

नवी दिल्ली – एअरसेल माक्‍सिस मनी लॉंड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना 8 ऑक्‍टोबरपर्यंत अटक न करण्याचे संरक्षण कोर्टाने दिले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधिश ओ.पी. सैनी यांनी या प्रकरणाची सुनावणी 8 ऑक्‍टोबर पर्यंत पुढे ढकलली असून चिदंबरम पित्रापुत्रांना अटकेपासून देण्यात आलेले संरक्षण तो पर्यंत कायम राहींल असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या विषयावर झालेल्या सुनावणीच्यावेळी ईडी आणि सीबीआयचे मुख्य वकिल उपस्थित नव्हते त्यामुळे ही सुनावणी तहकुब करण्याची विनंती याच यंत्रणांकडून करण्यात आल्याने न्यायालयाने ही सुनावणी तहकुब केली. आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी चिदंबरम पितापुत्रांकडून करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)