पी. के. स्कूलमधील क्रीडा सप्ताहाचे उद्‌घाटन

पिंपरी – पिंपळे सौदागर येथील व्ही. एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाला सुरुवात झाली. त्याचे उद्‌घाटन फुटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू प्रशांत घाडगे व हॉकीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले.

क्रीडा सप्ताहाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळही महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलागुण व कल पाहूनच खेळाची निवड करावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे तसेच त्याचा आहार देखील सात्विक असावा. त्यात फास्टफूडचा समावेश नसावा, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दीप्ती आमले व कीर्ती कान्हेरे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)