पी.एस. टोल कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे- वेळु फाटा येथील महामार्गाचे काम बंद पडल्याने स्थानिक नागरिकांनी पी.एस. टोल रोड प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसांनी सहा जणांना अटक केली होती. मात्र त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर मुक्‍त करण्यात आले आहे.
या संदर्भात फिर्यादी सुनिल सुराणा (46, रा. नऱ्हेगाव, ता. हवेली) हे रिलायंन्स कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अमोल बाळासाहेब पांगारे (39, रा. वेळु, ता. भोर), विकास रमेश चव्हाण (27, रा. पेंजळवाडी, ता. भोर), रोहिदास पांडुरंग कोंडे (24, रा. कासुर्डे, ता. भोर), प्रविण रोहिदास शिंदे (शिंदेवाडी, ता. भोर), विनायक शिवाजी कोळी (28, रा. जांभळी, ता. भोर) आणि रविंद्र वामन वाडकर (56, रा. ससेवाडी, ता. भोर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आणखी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास लाकडी बांबू घेऊन आंबेगाव खुर्द येथील पीएस टोल रोड प्रा. लि. कंपनीचे कार्यालय गाठले. तेथे वळु फाटा येथील महामार्गाचे काम का करत नाही, ते काम का बंद पडले आहे. यामुळे अपघात होतात, याची कल्पना अगोदर दोन ते तीन वेळा दिली असल्याचा जाब विचारला. यानंतर भिंतीवरील घड्याळ, केबीनची काच, ऑफिसच्या दरवाजाची काच, खिडकीची काच, लॅन्ड लाईनचा फोन फोडुन नुकसान केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. यादव तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)