पी. एन. गाडगीळ अँड सन्स गुंतवणूक वाढविणार 

पंधरा नव्या स्टोअरसाठी 256 कोटींची गुंतवणूक 
विविध राज्यात स्टोअरची संख्या 40 पर्यंत वाढणार 
पुणे – पी. एन. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड (कंपनी) या स्टोअरच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कंपनीने (स्रोत: क्रिसिल अहवाल) 500 कोटी रुपयांच्या प्रारंभी समभाग विक्रीतील अंदाजे 256 कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्र आणि/किंवा लगतच्या राज्यांतील 15 ठिकाणी 15 नवी स्टोअर सुरू करण्यासाठी वापरायचे ठरवले आहे. कंपनीच्या स्टोअरचे जाळे एप्रिल 1, 2012 रोजीच्या दोन स्टोअरवरून मार्च 31, 2018 रोजी 25 स्टोअरपर्यंत वाढले आहे. स्टोअरची संख्या आर्थिक वर्ष 2019 मध्ये 29 पर्यंत व आर्थिक वर्ष 2020 मध्ये 40 पर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. ही सर्व स्टोअर कंपनीच्या मालकीची आहेत व कंपनीद्वारे चालवली जातात.

कंपनीने 2 ठिकाणी लार्ज फॉरमॅट स्टोअर्स सुरू करायचे ठरवले असून त्यासाठी प्रत्येकी 5.3 कोटी रुपये भांडवली खर्च केला जाणार आहे, तसेच प्रत्येक 1.12 कोटी रुपये कॅपेक्‍सद्वारे 9 स्मॉल फॉरमॅट स्टोअर सुरू करायचे ठरवले आहे. कंपनी प्रति स्टोअर 1.81 कोटी रुपये खर्च करून पुण्यातील उपनगरे व बदलापूर/डोंबिवली येथे मीडिअम फॉरमॅट स्टोअर व प्रति स्टोअर 1.12 कोटी रुपये कॅपेक्‍सद्वारे शिर्डी व फलटण येथे स्मॉल फॉरमॅट स्टोअर सुरू करणार आहे. कंपनीने विशिष्ट कर्जांची परतफेड/प्रीपेमेंट करण्याच्या दृष्टीने 112 कोटी रुपये व उर्वरित रक्कम अन्य कॉर्पोरेट उद्देशाने वापरण्याचे नियोजन केले आहे.

कंपनीच्या सर्व 25 स्टोअरमध्ये असलेल्या एकूण इन्व्हेंटरीचे प्रमाण 381.999 कोटी रुपये असून ते प्रति स्टोअर सरासरी 15.28 कोटी रुपये आहे. कंपनीने नवी 15 स्टोअर सुरू करायचे ठरवले आहे आणि इतक्‍याच प्रमाणात सरासरी इन्व्हेंटरीची आवश्‍यकता व्यक्त केली आहे. प्रस्तावित नवी स्टोअर सुरू करण्यासाठी 229.2 कोटी रुपयांची गरजेची आहेत.

पी. एन. गाडगीळ ब्रॅंडची परंपरा सन 1832 पासून, प्रमोटर-अध्यक्ष गोविंद गाडगीळ यांच्या कुटुंबाच्या सहा पिढ्यांपासून चालत आली आहे. कंपनीच्या स्टोअरचे वर्गीकरण प्रामुख्याने स्टोअरच्या आकारानुसार तीन फॉरमॅटमध्ये केले आहे – 11 लार्ज फॉरमॅट स्टोअर्स, 6 मीडिअम फॉरमॅट स्टोअर्सफ व 8 स्मॉल फॉरमॅट स्टोअर्स. कंपनीची महाराष्ट्रात 23 स्टोअर्स आहेत व गुजरात व कर्नाटक येथे प्रत्येकी एक स्टोअर असून, एकूण बिल्ट अप क्षेत्र 100,213 चौरस फूट आहे. कंपनीने स्टोअरची विभागणी झोनल मॉडेलनुसार तीन स्वतंत्र झोनमध्ये केली आहे – पुणे-झोन, नाशिक-झोन व सोलापूर-झोन. कंपनी आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्रीही करते www.onlinepng.com.

एबिटामध्ये वार्षिक 18.76% म्हणजे, आर्थिक वर्ष 2014 मधील 57.238 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2018 मध्ये 113.87 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली व करोत्तर नफ्यामध्ये 24.84% म्हणजे, आर्थिक वर्ष 2014 मधील 23.697 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2018 मध्ये 57.558 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.
कंपनीने गुणवत्ता व शुद्धता निकषांच्या अनुषंगाने 22 कॅरेटपर्यंतच्या व हॉलमार्क असलेल्या सुवर्ण दागिन्यांची विक्री करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रणाच्या पद्धतींचा अवलंब केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)