“पीसीसीओईआर’ मध्ये टेक्‍नोवेट स्पर्धा

पिंपरी – आधुनिक संशोधनाचा व विज्ञानाचा उपयोग सर्व घटकांतील मानवीजीवन अल्प खर्चात समृद्ध करण्यासाठी करता आला पाहिजे. पर्यावरणाचे व नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करीत संशोधन विकसित केले पाहिजे. त्या संशोधनाचा उपयोग दीर्घकाळ समाजाला करता आला पाहिजे. यातून वेळ, ऊर्जा व पैशाची बचत होणे देखील महत्वाचे असल्याचे मत भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्राचार्य डॉ. जि. ए. हिंगे यांनी व्यक्‍त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे आयोजित केलेल्या टेक्‍नोवेट 2018′ या तांत्रिक स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ न-हे येथील भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्राचार्य डॉ. जि.ए.हिंगे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्रकल्प समन्वयक प्रा. दिपक बिरादार, प्रा. संतोष रणदिवे आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य हिंगे यांनी पीसीसीओईआर मध्ये होत असलेल्या आधुनिक संशोधनाबाबत कौतुक केले. रिसर्च ण्ड इनोव्हेशन सेल अंतर्गत या महाविद्यालयात मागील दोन वर्षात 90 पेक्षा अधिक पेटंटची, नोंदणी 25 हुन जास्त संशोधन पेपर आणि 250 कॉपीराईटची एकाच वेळी नोंदणी करण्यात आली हे अभिनंदनीय असल्याचे हिंगे म्हणाले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, एस. डी. मराठे, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वागत प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, सुत्रसंचालन प्रा. दिपक बिरादार आणि आभार प्रा.संतोष रणदिवे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)