“पीसीसीओईआर’ मध्ये “इस्रो’ चे अभ्यासक्रम

पिंपरी – अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पदवीत प्रगत तंत्रज्ञानाधारीत संगणक प्रणालीचे शिक्षण दिल्यास रोजगार मिळवण्यास उपयोग होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील शंभर “स्मार्ट’ शहरे विकसीत करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात इस्रोचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अनेक रोजगार संधी उपलब्ध आहेत, असे मत सुपर ब्रेन्स इंडियाचे संचालक युवराज लांबोळे यांनी व्यक्‍त केले.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) मानवी जीवन अधिक सुखी व्हावे यासाठी अनेक संगणक प्रणाली उपग्रहांमार्फत विकसित केल्या आहेत. त्यातील काही संगणक प्रणालीचे प्रशिक्षण पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे सुरू करण्यात आले आहे. या लॅबचे उद्‌घाटन युवराज लांबोळे यांच्या हस्ते झाले. पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, इस्रो आऊटरी प्रोग्रॅम सेंटरचे समन्वयक प्रा. सुदर्शन बोबडे, प्रा. मयुरी येवले, प्रा. आकाश गुंजाळ व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

समन्वयक प्रा. बोबडे यांनी इस्रो आऊटरी प्रोग्रॅम सेंटरची माहिती देताना सांगितले की, इस्रोचा हा उपक्रम समाजातील सर्व स्तरावर पोहचवण्यासाठी शैक्षणिक संस्थांना रोज दुपारी 4 ते 5.30 या वेळेमध्ये मोफत इस्रोचे डिस्टन्स लर्निंग सेंटर इस्रो शास्त्रज्ञाचे व्याख्यान आणि प्रात्यक्षिके ह्याचे अविरत प्रेक्षपण करेल. तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल लायब्ररी व काही नियतकालिके व आवडीच्या विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करुन देत आहे.

यातून व्यवस्थापन हवामान खाते, रस्ते सुरक्षा, सीमा सुरक्षा, शहर नियोजन महसूल खाते, पाणी पुरवठा, मासेमारी, मिळकत कर वसूली, भूगर्भ संशोधन, वन संशोधन यासाठी उपलब्ध भूजल संचय, भूमी उपायोजन, मृदा शक्ती, आपत्तीजनक विभाग, दुष्काळ सदृश भाग ह्या सारख्या घटनांचे अचूक मुल्यमापन करता येते.
प्रा. मयूरी येवले यांनी विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रा. आकाश गुंजाळ यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. लॅबच्या उभारणीत पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी मार्गदर्शन केले.

रोजगार निर्मितीला चालना
विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञाची ओळख व्हावी या उद्देशाने पीसीसीओईआर येथे स्थापत्य विभागात, इस्रो आईआईआरस आउटरीच प्रोग्रॅम सेंटर फॉर रिमोट सेन्सिंग, जिऑग्राफिकल इन्फॉर्मशन सिस्टिम व ग्लोबल नॅव्हिगेशन सिस्टिम केंद्र असून अद्यावत लॅब व ग्रंथ उपलब्ध आहेत. ह्या अभ्यासक्रमात विज्ञान, अभियांत्रिकी, भूगोलशास्त्र, भौतिक शास्त्र, कृषी विज्ञान, भूगर्भ शास्त्र, भूअभियांत्रिकी शास्त्र, शहर नियोजन, वस्तू शास्त्र आणि तसेच सामाजिक शास्त्रमध्येही संशोधन करत असलेले विद्यार्थी तंत्रज्ञानाचा अभ्यास करु शकतात. भविष्यात या तंत्रज्ञावर आधारित अनेक रोजगार निर्मिती होणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. हरिश तिवारी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)