“पीसीएमसी’ चे संकेतस्थळ देशात सर्वोत्कृष्ट

पिंपरी – दिव्यांगांना हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ देशात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. अशा प्रकारचे पारितोषिक मिळवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

जागतीक अपंग दिनानिमित्त दिल्ली येथील विज्ञान भवन येथे सोमवार दि. 3 ला उपराष्ट्रपती व्येंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री विजय सांपला, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. महापौर राहुल जाधव व मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रीय पुरस्कार 2018 साठी केंद्र शासनाचे दिव्यांग व्यक्‍तींचे सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने 29 ऑगस्ट रोजी प्रस्ताव पाठवला होता. केंद्र शासनाच्या डिसअँबेलिटीसाठीच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेली संकेतस्थळे (वेबसाईट) दिव्यांग व्यक्‍तींना वापरण्याच्या दृष्टीने परिपूर्ण करणेबाबत महाराष्ट्र शासनामार्फत कळवणेत आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)