पीवाय फॅसिलिटीज, अमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर संघांचे विजय

ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे: पीवाय फॅसिलिटीज, ऍमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर या संघांनी अनुक्रमे एलेनो एनर्जी व एएफके इलेव्हन संघांचा पराभव करून येथे सुरू असलेल्या ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत विजयी आगेकूच नोंदवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आशिष शर्मा(नाबाद 59)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीवाय फॅसिलिटीज संघाने एलेनो एनर्जी संघाचा 38 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना पीवाय फॅसिलिटीज संघाने 20षटकात 6बाद 146धावा केल्या. यात आशिष शर्माने 37चेंडूत 6चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 59धावा केल्या. आशिषला अभिजित बाकरे 28, अमित शर्मा 13यांनी धावा काढून सुरेख साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना एलेनो एनर्जी संघ 18.4षटकात सर्वबाद 108धावावर संपुष्टात आला. यात प्रवीण पाटील 30, हनुमंत गाडे 21, अजय निकम 15यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पीवाय फॅसिलिटीज कडून राज सांबरे 3-12, आलोक व्यवहारे 2-16, अभिजित बाकरे 2-19यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी आशिष शर्मा ठरला.

तर, दुसऱ्या सामन्यात शैझाद शेख याने केलेल्या 68 चेंडूत नाबाद 70 धावांच्या खेळीच्या जोरावर ऍमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर संघाने एएफके इलेव्हनचा 31 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

सविस्तर निकाल :
साखळी फेरी – पीवाय फॅसिलिटीज: 20 षटकांत 6 बाद 146 (आशिष शर्मा नाबाद 59, अभिजित बाकरे 28, अमित शर्मा 13, अजय निकम 3-12, प्रवीण पाटील 1-21, अभिजित चव्हाण 1-35) वि.वि. एलेनो एनर्जी : 18.4 षटकांत सर्वबाद 108 (प्रवीण पाटील 30, हनुमंत गाडे 21, अजय निकम 15, राज सांबरे 3-12, आलोक व्यवहारे 2-16, अभिजित बाकरे 2-19).

ऍमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर – 20 षटकांत 9 बाद 124 (शैझाद शेख नाबाद 70, नरेंद्र देसाई 16, अजय कोकाटे 2-14, ताराप्रकाश 2-31) वि.वि. एएफके इलेव्हन : 18.2 षटकांत सर्वबाद 93 (प्रतीक रोकडे 15, विकास जगदाळे 14, सुरज कदम 11, उमेर अहमद 3-16, उमर पिरजादा 2-14).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)