पीवायसी हिंदू जिमखाना संघाची विजयी सलामी

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे, दि. 21 – पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत मिहिर देशमुखच्या अफलातून 44 धावांच्या बळावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा पराभव करत स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस गाजवला.

-Ads-

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत घरच्या मैदानावर खेळताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 16 धावांनी पराभव करत विजयी सुरूवात केली. प्रथम फलंदाजी करताना मिहिर देशमुखच्या अफलातून 44 धावांच्या बळावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 44 षटकात 9 बाद 186 धावा केल्या. यात समर्थ काळभोरने 37 तर सुफीयाना सय्यदने 26 धावा करून मिहिरला सुरेख साथ दिली. 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मिहिर देशमुख , कुश पाटील , पार्थ शेवाळे व रोहित कांबळे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघाचा डाव 44 षटकात 8 बाद 170 धावांत अटोपला. 44 धावा व 2 गडी बाद करणारा मिहिर देशमुख सामनावीर ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन पीएमआरडीचे प्रमुख व आयुक्त किरण गिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यामध्ये पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे , क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, अभिषेक ताम्हाणे, स्पर्धा नियोजन समितीचे सदस्य रणजीत पांडे, इंद्रजीत कामटेकर, पराग शहाणे, शिरिष गांधी व कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

– साखळी फेरी

पीवायसी हिंदू जिमखाना- 44 षटकात 9 बाद 186 धावा(मिहिर देशमुख 44, समर्थ काळभोर 37, सुफीयाना सय्यद 26, करण जगवाडे 3-27, अथर्व सनस 2-30, आदित्य कुलकर्णी 1-37, वेदांत सनस 1-28, सर्वेश सुर्वे 1-39) वि.वि डेक्कन जिमखाना- 44 षटकात 8 बाद 170 धावा(अथर्व सनस 47, कृष्णा देवतरसे 29, सर्वेश सुर्वे 22, मिहिर देशमुख 2-25, कुश पाटील 1-26, पार्थ शेवाळे 1-32, रोहित कांबळे 1-7) सामनावीर- मिहिर देशमुख
पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 16 धावांनी सामना जिंकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)