पीवायसी हिंदू जिमखाना संघाची आगेकुच

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे: पीवीयसी हिंदू जिमखाना संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत युनायटेड स्पोर्टस क्‍लब संघाचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत आगेकुच नोंदवली.

-Ads-

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने साईराज चोरगेच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर युनायटेड स्पोर्टस्‌ क्‍लब संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना निखिल लुनावत, मिहिर देशमुख व कुश पाटील यांच्या अचूक गोलंदाजीपुढे युनायटेड स्पोर्टस्‌ क्‍लब संघाचा डाव 44.5 षटकात सर्वबाद 173 धावात अटोपला.

यात रणवीर सिंग चौहाणने 41 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 173 धावांचे लक्ष साईराज चोरगेच्या नाबाद 55 धावांसह पीवायसी हिंदू जिमखाना संघाने केवळ 36.4 षटकात 3 बाद 175 धावांसह सहज पुर्ण केले. सुफीयान सय्यदने 40 धावा करून साईराजला सुरेख साथ देत संघाला विजय मिळवून दिला. 77 चेंडूत 55 धावा करणारा साईराज चोरगे सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल –

साखळी फेरी

युनायटेड स्पोर्टस्‌ क्‍लब- 44.5 षटकांत सर्वबाद 173 धावा(रणवीर सिंग चौहाण 41, माहीर रावळ 32, शॉन अलेक्‍स 13, अंशुल हंपीया 13, निखिल लुनावत 3-21, मिहिर देशमुख 2-25, कुश पाटील 2-31, साईराज चोरगे 1-28, पुरब उपाध्ये 1-17) पराभूत वि पीवायसी हिंदू जिमखाना- 36.4 षटकात 3 बाद 175 धावा(साईराज चोरगे नाबाद 55(77), सुफीयान सय्यद 40, मिहिर देशमुख 27, आर्य पानसे नाबाद 15, समर्थ काळभोर 14, समर्थ वाबळे 1-27, सुमील दाभोळकर 1-28, अंशुल हंपीया 1-32) सामनावीर- साईराज चोरगे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)