पीवायसी हिंदू जिमखाना आणि पूना क्‍लब संघांनी उदघाटनाचा दिवस गाजवला 

राजू भालेकर करंडक क्रिकेट स्पर्धा 
पुणे पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना, पूना क्‍लब या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उदघाटनाचा दिवस गाजवला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात अखिलेश गवळे पाटील याच्या उपयुक्त 42 धावांच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघ 45 षटकांत 164 धावाच करु शकला. यात ओंकार आढवडे 43, शंतनु कदम 40, कनय्या लड्डा 17, राजवर्धन उंडरे 15 यांनी थोडा फार प्रतिकार केला. तर, पीवायसीकडून साहिल चुरी 24धावा देत 4 गडी बाद केले, यश माने 39 धावांत 2 गडी बाद केले तर आर्य जाधव 1-22, सिद्देश वीर 1-32 यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला.

164 धावांचे आव्हान पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 41.1 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण करत सामना जिंकला. यावेळी अखिलेश गवळे पाटीलने 75 चेंडूत नाबाद 42 धावांची संयमी खेळी केली. अखिलेशला श्रेयश वालेकर 35, साहिल मदन नाबाद 31, शुभंकर हार्डीकर 19 यांनी महत्वपुर्ण साथ देत संघाला विजय मिळवून दिला. तर सामनावीर म्हणुन अखिलेश गवळेचा सन्मान करण्यात आला. तर, दुसऱ्या सामन्यात अनिश पलेशा ( 68धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूना क्‍लब संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 5 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.

स्पर्धेचे उदघाटन स्वर्गीय महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर यांच्या पत्नी रिजुता भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार यजुवेंद्र सिंग, मिलिंद गुंजाळ, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे, गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड, क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, क्‍लबचे सचिव आनंद परांजपे, रणजित पांडे, एमसीएचे रियाज बागवान, शेखर नानिवडेकर, तन्मय आगाशे, अविनाश जाधव, सारंग लागू, गिरीश करंबेळकर, अभिषेक ताम्हाणे, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
क्‍लब ऑफ महाराष्ट्र 45 षटकांत सर्वबाद 164 (ओंकार आढवडे 43, शंतनु कदम 40, साहिल चुरी 24-4, यश माने 39-2) पराभूत वि.पीवायसी हिंदू जिमखाना 41.1 षटकांत 6 बाद 168 (अखिलेश गवळे पाटील नाबाद 42, श्रेयश वालेकर 35, साहिल मदन नाबाद 31, हर्ष पालो 44-2, कनय्या लड्डा 22-2, मोनिश गोखले 1-19); सामनावीर- अखिलेश गवळे पाटील

डेक्कन जिमखाना: 43.1 षटकांत सर्वबाद 207 (प्रखर अगरवाल 48, यशोधन शुक्‍ला 45, अभिषेक ताटे 23, दर्शित लुंकड 30-3, ओंकार साळुंके 28-2,) पराभूत वि. पूना क्‍लब: 40.5 षटकांत 5 बाद 209 (अनिश पलेशा 68, निलय नेवस्कर 32, ओंकार मोहोळ 24, संचित दास नाबाद 22, आत्मन पोरे 30-2, अभिषेक ताटे 52-2, आर्यन बांगळे 20-1); सामनावीर- अनिश पलेशा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)