पीवायसी करंडक निमंत्रित क्रिकेट स्पर्धा: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद

पुणे: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने केडन्स क्रिकेट अकादमीचा 19 धावांनी संघाचा पराभव करत येथे सुरू असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब आयोजित जावडेकर आणि स्कायआय पीवायसी करंडक 14वर्षाखालील गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

पीवायसी क्‍लबच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 42 षटकांत 8 बाद 201 धावा केल्या. यावेळी त्यांच्या ओंकार राजपूतने 67 चेंडूत 55 धावा, तर कबीर भट्टाचार्जीने 57 चेंडूत 42 धावा केल्या. ओंकार राजपूत व कबीर भट्टाचार्जी यांनी पाचव्या विकेटकरीता 100 चेंडूत 87 धावांची भागीदारी करत संघाला 201 धावांचा टप्पा गाठुन दिला. प्रत्युत्तर देताना ओंकार राजपूत व ओम भाबड यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव 39.5 षटकांत 182 धावांवर संपुष्टात आल्याने त्यांना 19 धावांनी पराभूत व्हावे लागले. यावेळी केडन्सच्या अर्शीन कुलकर्णी 37, वेदांत जगदाळे 26, दिग्विजय पाटील 31, मोहित दहीभाते 29, अनिरुद्ध साबळे 25, प्रथमेश थिटे 15 यांनी दिलेली लढती अपुरी ठरली. व्हेरॉककडून ओंकार राजपूत व ओम भाबड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणारा ओंकार राजपूत अंतिम सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेतील विजेत्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला करंडक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्कायआय डेव्हलपर्सचे अभिजीत जगताप आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसीच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रणजीत पांडे, इंद्रजित कामतेकर, पराग शहाणे, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

अंतिम फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 42 षटकांत 8 बाद 201 (ओंकार राजपूत 55, कबीर भट्टाचार्जी 42, वैभब आगम 36, भार्गव महाजन नाबाद 21, अनिरुद्ध साबळे 3-30, निशांत राजपाठक 1-20, निलय सिंघवी 1-32) वि.वि. केडन्स क्रिकेट अकादमी: 39.5 षटकांत सर्वबाद 182 (अर्शीन कुलकर्णी 37, वेदांत जगदाळे 26, दिग्विजय पाटील 31, मोहित दहीभाते 29, अनिरुद्ध साबळे 25, प्रथमेश थिटे 15, ओंकार राजपूत 2-26, ओम भाबड 2-42).

इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: क्रिश शहापुरकर (269धावा, क्‍लब ऑफ महाराष्ट्र);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: ओंकार राजपूत (10विकेट, व्हेरॉक);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: साईराज चोरगे (पीवायसी);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: आर्यन गोजे (केडन्स);
मालिकावीर: अर्शीन कुलकर्णी (250धावा व 3विकेट).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)