पीवायसी करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून 

पुणे: पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे आयोजीत केलेली पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार असून ही स्पर्धा 2 डिसेंबर पर्यंत होईल.

सदर स्पर्धा 20 षटकांची घेण्यात येणार असून यामुळे कुमार स्तरावर अधिक चुरशीची अशी पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतील सहभागी 8 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून या स्पर्धेतील सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविले जाणार आहेत. हे सामने पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब, डेक्कन जिमखाना, नेहरू स्टेडियम, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पुना क्‍लब या मैदानावर होणार आहेत.

-Ads-

यासंदर्भात आयोजीत पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे, क्‍लबचे सचिव आनंद परांजपे आणि क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले की, या स्पर्धेत यजमान पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब, डेक्कन जिमखाना, कॅडेन्स अकादमी, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पुना क्‍लब, क्‍लब ऑफ महाराष्ट्र, क्रिकेट मास्टर्स अकादमी, युनायटेड क्रिकेट क्‍लब अशा 8 संघांना निमंत्रित करण्यात आले आसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि क्‍लबचे सचिव आनंद परांजपे, क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड , विलास जावडेकर डेव्हलपर्सचे निरंजन कुलकर्णी, स्कायी डेव्हलपर्सचे अभिजीत जगताप, रणजीत पांडे, इंद्रजीत कामटेकर, निरंजन गोडबोले, पराग शहाणे, शिरिष गांधी व कपिल खरे यांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)