पीवायसी करंडक क्रिकेट स्पर्धा: पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा एकतर्फी विजय 

पुणे: पीवीयसी हिंदू जिमखाना संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखताना क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 10 गडी राखून पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे 14 वर्षाखालील निमंत्रित पीवायसी करंडक क्रिकेट स्पर्धेत मोठ्या विजयाची नोंद केली.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखत क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कुश पाटीलच्या आक्रमक व अचूक गोलंदाजीपुढे क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 44.3 षटकात सर्वबाद 173 धावांत गारद झाला. यात विवेक टिपरेने 43 तर साहिल कडने 40 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.

-Ads-

कुश पाटीलने केवळ 25 धावा देत 5 गडी बाद करून क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव खिळखीळा केला. 173 धावांचे लक्ष समर्थ काळभोरच्या 78 व सुफियान सय्यदच्या 60 धावांसह पीवायसी हिंदू जिमखाना संघाने एकही गडी न गमावता केवळ 37.1 षटकात 174 धावा करून सहज पुर्ण केले. 25 धावांत 5 गडी बाद करणारा कुश पाटील सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल- साखळी फेरी 
क्‍लब ऑफ महाराष्ट्र – 44.3 षटकांत सर्वबाद 173 (विवेक टिपरे 43, साहिल कड 40, प्रणव केळकर 31, कुश पाटील 5-25, निखिल लुणावत 1-39, प्रणित अठवले 1-14, सुफियान सय्यद 1-11) पराभूत वि पीवायसी हिंदू जिमखाना- 37.1 षटकांत बिनाबाद 174 (समर्थ काळभोर 78, सुफियान सय्यद 60), सामनावीर- कुश पाटील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)