पीवायसी ‘अ’ व पीवायसी ‘क’ यांच्यात होणार विजेतेपदासाठी लढत 

संग्रहित छायाचित्र
एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा 
  
पुणे  – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत पीवायसी अ संघाने सीसीआय अ संघाचा 22-8असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी सामन्यात पीवायसी अ संघाने सीसीआय अ संघाचा 2-8असा पराभव केला. सामन्यात 110 वयोगटात दुहेरी गटात पीवायसी क संघाच्या हिमांशू गोसावी व डॉ.जमेनिस यांना सीसीआयच्या ड्रिंडा दयाल व सागर इंजिनिअर या जोडीने 4-6 असे पराभूत करून संघाला आघाडी मिळवून दिली.
90 अधिक गटात पीवायसीच्या पराग नाटेकर व हेमंत बेंद्रे या जोडीने सीसीआयच्या इम्रान व निखिल संपत यांचा 6-2 असा पराभव करून हि आघाडी कमी केली. त्यानंतर खुल्या दुहेरी गटात अभिषेक ताम्हाणेने रितू कुलकर्णीच्या साथीत सीसीआयच्या जयेश संपत व प्रसाद प्रधान यांचा 6-0 असा तर, खुल्या दुहेरी गटात पीवायसीच्या प्रशांत सुतार व केतन धुमाळ यांनी लव कोठारी व विक्रम संपत यांचा 6-0असा सहज पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
पीवायसी अ वि.वि.सीसीआय अ 22-8(110वयोगट दुहेरी गट: हिमांशू गोसावी / डॉ.जमेनिस पराभूत वि. ड्रिंडा दयाल / सागर इंजिनिअर 4-6; 90अधिक गट: पराग नाटेकर / हेमंत बेंद्रे वि.वि. इम्रान / निखिल संपत 6-2; खुला दुहेरी गट: अभिषेक ताम्हाणे / रितू कुलकर्णी वि.वि.जयेश संपत / प्रसाद प्रधान 6-0; खुला दुहेरी गट: प्रशांत सुतार / केतन धुमाळ वि.वि. लव कोठारी / विक्रम संपत 6-0).

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)