पीपी ऍक्‍टनुसार होणाऱ्या कारवाई स्थगित देण्यासाठी खासदारांचे आश्‍वासन

देहूरोड, (वार्ताहर) – देहूरोड कॅंन्टोन्मेंटकडून पीपी ऍक्‍टनुसार होणारी कारवाई स्थगित करण्यासाठी संसदेत प्रयत्न करण्याचे आश्‍वासनानंतर देहूरोड बचाव संघर्ष समितीने सुरू आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने देहूरोड बाजारपेठ, गांधीनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, पंडित चाळ, इंदिरानगर, नायडूनगर, लक्ष्मीनगर, पारशी चाळ, राजीव गांधीनगर, शितळानगर येथील संरक्षण विभागाच्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना पीपी ऍक्‍टनुसार एक नोव्हेंबरपासून सुमारे साडेतीनशेहून अधिक नोटीस दिल्या आहेत. त्यावर सुनावणी घेण्यात येत आहेत. वर्षोनवर्ष राहणाऱ्या नागरीकांसाठी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्‍यकता असल्याची मागणी करीत संघर्ष समितीचे भाजपचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सूर्यकांत सुर्वे, आरपीआय (आठवले गट) चे अमित छाजेड व परशुराम (जक्कल) तेलगू यांनी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु केले होते. आंदोलनास संबंधित भागातील नागरिक तसेच माजी नगरसेवक मारुती कांबळे, मानव कांबळे, संदेश भेगडे यांच्यासह विविध पक्ष व संघटना यांनी पाठिंबा दिला होता. आंदोलन दरम्यान समितीमार्फत कॅन्टोन्मेंट बोर्डाने चुकीच्या पद्धतीने नोटीसा बजावून सुनावणी घेत असल्याचे विविध मुद्दे निदर्शनास आणून दिले होते.

सर्वोच्य न्यायालयाने सप्टेंबर 2016 महिन्यात पंचमढी (मध्यप्रदेश) कॅन्टोन्मेंट संबंधित एका खटल्यासंदर्भांत दिलेल्या निर्णयानुसार दिल्लीतील रक्षा महानिर्देशकांच्या 3 फेब्रुवारी 2017 च्या एका पत्रानुसार तसेच प्रधान संचालक दक्षिण विभाग पुणे यांच्या एक मार्च 2017 पत्रानुसार कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संरक्षण विभागाच्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांची नावे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदार यादीत समावेश करण्यास मनाई केली होती. अतिक्रमितांची मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत केंद्र सरकार मार्फत संबंधित न्याय पालिकेत बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे मागणी केली. त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे बारणे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.

तसेच तूर्त सरकारी जागेवर चुकीच्या पद्धतीने नोटिसा देण्याचे व सुनावणी घेण्याचे थांबविण्यात आल्याचे स्पष्ट केले. लोहमार्गाच्या चौथ्या ट्रॅकमुळे बाजारपेठ भागात होणाऱ्या परिणामांबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे बारणे यांनी सांगितले. त्यानंतर सूर्यकांत सुर्वे, अमित छाजेड व परशुराम (जक्कल) तेलगू यांनी सुरु केलेले उपोषण सोडल्याचे सुर्वे यांनी जाहीर केले.

या वेळी कॅन्टोन्मेन्टचे सीईओ अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल सदस्य रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, माजी उपाध्यक्षा सुनंदा आवळे, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, मेहरबान सिंग, गौसिया शेख, काशिनाथ सूर्यवंशी, कांतीलाल पारेख, केसरीमल जैन, धनराज शिंदे, यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)