पीडीपी फोडण्याचा प्रयत्न महागात पडेल

मेहबुबा मुफ्ती यांचा भाजपला इशारा
श्रीनगर – केंद्र सरकारकडून आमचा पीडीपी पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला तर तो सरकारला महागात पडेल आणि त्याचे परिणामही अत्यंत धोकादायक असतील असा इशारा या पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की आमचा पक्ष बळकट आहे. तथापी आमच्यातही काही मतभेद आहेत. पण हे मतभेद आम्ही आपसात चर्चा करून सोडवू. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने आमच्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

त्या म्हणाल्या की राज्यातील 1987 च्या निवडणुकीतील घडामोडीतूनच हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहउद्दीन सय्यद आणि महंमद यासिन मलिक सारखे नेतृत्व तयार झाले आहे या बाबी दुर्लक्षित करता येणार नाहीत.

आमच्या पक्षात मतभेद नाहीत असे नाही पण जे काही मतभेद आहेत ते आम्ही सोडवू. याचा लाभ घेऊन पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न होणे धोकादायक ठरेल. केंद्र सरकारच्या सहभागाशिवाय अशी पक्षीय फूट पडू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या प्रतिपादनावर प्रतिक्रीया देताना माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की पीडीपीचे काय होईल त्याच्याशी काश्‍मीरचा संबंध नाहीं. पीडीपीत फूट पडली तरी राज्यात एकही नवीन गनिमी नेता तयार होणार नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)