पीडित कुटुंबाला संसारुपयोगी वस्तू देऊन आहिल्यादेवी जयंती साजरी

कोल्हार खुर्द – कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथे उत्साह आणि जल्लोषाला फाटा देत फकिरा कारभारी खाटेकर या पीडित कुटुंबाला संसारुपयोगी वस्तू देऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
गेल्या दोन दिवसापूर्वी राहता तालुक्‍यातील कोल्हार बुद्रुक येथील रहिवासी फकिरा कारभारी खाटेकर हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असलेल्या कुटुंबाच्या छपराला आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत कुटुंबाच्या घरासह 14 शेळ्या, गाय विकून मिळालेले 6 हजार रुपये, तसेच संसार उपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मोठे नुकसान झाले. या कुटुंबावर आलेल्या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी कोल्हार खुर्द येथील जय मल्हार सेनेचे कार्यकर्त्यांनी वर्गणी जमा करून या वर्गणीमधून पीडित कुटुंबासाठी संसार उपयोगी वस्तू भेट देण्याचे ठरविले.
यावेळी कोल्हार खुर्द ग्रामपंचायती समोर झालेल्या या कार्यक्रमात सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, जय मल्हार सेनेचे प्रकाश चिखले, राजेंद्र मतकर, अनिल चिखले, संजय लावरे, भास्कर चिखले, श्रीपती साबळे, सावळेराम चिखले, भास्कर वारे, भाऊसाहेब चांडे, भगवान खाटेकर, दत्तू शिंदे, संदीप सातव, दिलीप चिखले, अशोक थोरात, लक्ष्मण थोरात, यांच्यासह प्रभाकर जाधव, धनंजय शिरसाठ, महिपती शिरसाठ, गोरख कानडे, संजय भोसले, वसंत भोसले, गोकुळ शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी पी. एस. गोसावी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)