पीक विमा योजनेत राफेलपेक्षाही मोठा भ्रष्टाचार

शेतकऱ्यांची फसवणूक : किसान सभेचा खळबळजनक आरोप

पुणे – राफेलपेक्षा मोठा भ्रष्टाचार पीक विमा योजनेत झाल्याचे आरोप आता सर्वत्र होत आहेत.या आरोपात तथ्य असल्याचे शेतकरी संघटनांकडून आता आकडेवारीसह स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची त्वरीत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक असल्याचे सांगण्यात येत होते. शेती हा अनिश्‍चित व्यवसाय असल्याने याला विम्याचे संरक्षण असावे, अशी मागणी होती. त्याप्रमाणे केंद्राने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना सुरू केली, पण आता ही योजना म्हणजे भ्रष्टाचाराच्या सापळ्यात अडकली आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कमी पैसे मिळाल्याचे आरोप होत आहेत.

याबाबत किसान सभेने नुकतीच या प्रकरणात कशाप्रकारे गैरव्यवहार झाला आहे. त्याचे आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेअंतर्गत 2016-17 मध्ये तब्बल 1 कोटी 18 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला त्यांच्या प्रीमियमपोटी 4 हजार 17 कोटी रुपये जमा झाले आणि नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना 1 हजार 997 कोटी देण्यात आले. म्हणजे उर्वरित रक्कम ही विमा कंपन्यांनी स्वत:च्या खिशात घातली आहे. तीच स्थिती 2017 च्या खरिपामध्ये महाराष्ट्रात 3 हजार 317 कोटी रुपयांचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरला आणि नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना फक्त 1 हजार 996 कोटी रुपये मिळाले. म्हणजे उर्वरित रक्कम कुठे गेली, असा प्रश्‍न पडला आहे.

विमा कंपन्या शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. पीक कापणीत भ्रष्टाचार, मोजणीवेळी गोलमाल, क्षुल्लक कारणावरुन भरपाईचे क्‍लेम नाकारले जात आहेत. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे.
– डॉ. अजित नवले, किसान सभा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)