लवकरात-लवकर विमा नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
नगर – जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये, असा प्रशासनाचा प्रयत्न असून शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यात बॅंकेत गर्दी करण्यापेक्षा आताच विमा उतरवावा आणि ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी, पीक विमा नोंदणी करताना शेवटच्या दिवशी यंत्रणेवर ताण येऊन सर्व्हर बंद पडणे, तांत्रिक दोष निर्माण होणे, असे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन पीक विमा लवकरात-लवकर भरावा, असे आवाहन द्विवेदी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजना व पंतप्रधान विमा योजनेचा लाभ मिळावा व या योजनेत त्यांना सहभागी करुन घेण्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा अग्रणी बॅंकेमार्फत सर्व बॅंकांना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सांगितले आहे. त्यासाठी संपर्क मोहीमही सुरु आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अंतिम तारखेपूर्वीच हा विमा भरणे आवश्‍यक आहे. आपल्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. शेतीप्रधान जिल्हा असतानाही पीक विमा भरण्याचो प्रमाण नगण्य आहे. हे प्रमाण वाढविण्याची गरज असून शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. योजनेत विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै ही आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी गर्दी करण्यापेक्षा आताच पीक विमा भरावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

अंतिम टप्प्यात नोंदणीचा वेग वाढवण्याचे निर्देश
पीक विम्यासाठी अद्यापही पंधरा दिवस आहेत. या शिल्लक दिवसात शेतकऱ्यांनी आतापासूनच त्यांच्या नजीकच्या खाते असलेल्या बैंकेत पीक विमा भरावा, शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक विमा मिळवून देण्यासाठी आपण सर्व पीक विमा व पंतप्रधान विमा योजनेसंदर्भात उत्कृष्ट काम करु. त्यासाठी अंतिम टप्प्यांत नोंदणीचा वेग वाढवा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी बॅंक आणि कृषी विभागाला दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)