पीक उत्पादन 40 टक्‍क्‍यांहून अधिक घटणार

पावसाचा फटका : चार महिन्यांत 435 मिमी पाऊस

पुणे – पावसाच्या यंदाच्या चारही महिन्यांत जुलै वगळता अन्य तीन महिन्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम हा खरीप पिकांवर होणार असल्याचे दिसून येत आहे. पुणे विभागात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पीक उत्पादनात 40 टक्‍क्‍यांहून अधिक घट होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-

पुणे विभागात गेल्या चार महिन्यांत फक्त 435 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हे प्रमाण सरासरीच्या फक्त 68 आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा जुलैमध्ये झाला आहे. तर, सगळ्यात कमी सप्टेंबरमध्ये अवघा 30.1 मिलिमीटर झाला आहे. जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पुणे विभागात बऱ्यापैकी पेरण्या झाल्या होते. सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 118 टक्के पेरण्या झाल्या. तब्बल 9 लाख 34 हजार 730 हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाच्या कालावधीत चांगलाच खंड पडला असून कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याचे चित्र होते. त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्‍यात भातपीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, पावसातील मोठ्या खंडामुळे उत्पादनात जवळपास 25 ते 30 टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. बाजरी व मका पिकांच्या उत्पादनात सुमारे 25 ते 35 टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. तूर पिकांला फुले येण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मूग व उडीद पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. या पिकांच्या उत्पादनात सरासरी 40 ते 45 टक्के घट येण्याची शक्‍यता आहे.

वाढही खुंटली
भुईमूग व सूर्यफूल पिकांचीही वाढ खुंटली असून, उत्पादनात सुमारे 30 ते 40 टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यातही भातपीक निसवण्याच्या अवस्थेत असून, अनेक ठिकाणी करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यातच पावसाचा खंड यामुळे उत्पादनात 20 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट येण्याची शक्‍यता आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)