“पीएसएलव्ही’चे काउंटडाउन सुरू

श्रीहरिकोटा – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)कडून श्रीहरिकोटा येथील संशोधन केंद्रावर पीएसएलव्ही-सी42 या उपग्रहाचे 33 तासांचे काउंटडाउन शनिवारी दुपारी 1 वाजून आठ मिनिटांनी सुरू करण्यात आले आहे. हा उपग्रह सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून रविवारी रात्री 10 वाजून सात मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्रोच्या अधिका-यांनी दिली आहे.

या मिशनद्वारे नोव्हा-एसएआर आणि एसआय-4 हे दोन उपग्रह अंतराळात स्थापित करण्यात येणार आहे. याचे एकूण वजन 800 किलोग्राम आहे.

या विदेशी उपग्रहांद्वारे जंगलांचे नकाशे, पुर आणि आपत्ती परिस्थितीवर देखरेखीसह अन्य सुविधांसाठी उपयुक्‍त ठरणार आहे. पीएसएलव्ही-सी42 उपग्रह 583 कि.मी. अंतरावरील कक्षेत सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, इस्रोने आतापर्यत 237 विदेशी उपग्रहांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे. यामध्ये 12 जानेवारी 2018 रोजी एकाच वेळी तब्बल 28 उपग्रहांचे पीएसएलवी-सी42 मिशनद्वारे यशस्वी प्रक्षेपण केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)