पीएसआय पुर्वपरीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. पीएसआयच्या पूर्व परीक्षेतून 10 हजार 331 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. मुख्य परीक्षा 25 जून रोजी होणार आहे. आयोगाने पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआयच्या 650 पदांसाठी पूर्व परीक्षा घेतली होती. त्याचा आज निकाल जाहीर झाला. पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या व परीक्षेची गुणांची सीमारेषा उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. पीएसआयची मुख्य परीक्षा 25 जून रोजी होणार आहे. मुख्य परीक्षेसाठी दहा हजार 331 उमदेवार पात्र ठरले आहेत. पुणे केंद्रातून पात्र ठरलेल्या उमदेवारांनी संख्या 3 हजार 9 36 इतकी आहे, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्‍तिकरीत्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यावेळी उमदेवारांनी मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क मुदतीत सादर करणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय उमदेवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही, असे आयोगाचे उपसचिव विजया पडते यांनी
पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)