पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर

पुणे – पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा – 2017 मधील शारीरिक चाचणीसाठी वैद्यकीय कारणास्तव मुदतवाढ देण्याची विनंती केलेल्या उमेदवारांचा शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम दि. 26 ते 29 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. चाचणी अंधेरी येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात होणार आहे.

याबाबतचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर नवीन माहिती या सदरात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांनी त्या तारखेस उपस्थित राहावे, असे आयोगाने कळविले आहे. चाचणीसाठी येताना शारीरिक चाचणीचे पत्र उमेदवारांना इ-मेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच, त्यांना एसएमएसद्वारेही कळविले जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वैद्यकीय मुदतवाढीच्या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्याचदिवशी सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाणार नाही. तसेच, यानंतर चाचणीसाठी मुदतवाढ मिळण्याबाबतची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)