पीएमपी बस भाडेवाढीचा विचार तुर्तास नाही

पुणे – सातत्याने होत असलेल्या इंधनदरवाढीमुळे पीएमपी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून भाडेवाढीचा विचार केला जात असला, तरी संचालक मंडळाने याला स्पष्ट नकार दिला आहे. पीएमपीचे संचालक मंडळ या भाडेवाढीबाबत नकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय बस भाडेवाढीचा कुठलाही विचार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधनदरात मोठी वाढ होत आहे. याचा मोठा फटका पीएमपी प्रशासनाला बसत असल्याने अर्थकारण पूर्णपणे बिघडले आहे. सीएनजी दरांत नुकत्याच झालेल्या वाढीनेही यात मोठी भर पडली. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून भाडेवाढीसंदर्भात हलचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, पीएमपीच्या संचालक मंडळाने याला विरोध केला असून असा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सध्यातरी भाडेवाढ लांबणीवर पडली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)