पीएमपी बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी निधी

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. अनेकदा महिलांना बसने प्रवास करताना काही समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पीएमपी बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची सूचना करत त्यासाठी आमदार निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, ज्या मार्गावर महिला उशिरापर्यंत प्रवास करतात अशा मार्गावर हे सीसीटीव्ही लावण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट येथील कार्यालयात मंगळवारी महिलांसाठी “सुसंवाद दिन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी “महिला सुरक्षितता’ याविषावर त्या बोलत होत्या. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे, विधी अधिकारी नीता भरमकर, स्त्री आधार केंद्रचे रमेश शेलार आदी उपस्थित होते.

आमदार गोऱ्हे म्हणाल्या, काळानुरूप महिलांमध्ये धाडस आणि समज वाढत चालली आहे, महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे महिलांचे अनेक प्रश्‍न मार्गी लागत आहेत. महिलांच्या मदतीसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. ते स्वागतार्ह असल्याचे सांगून या समितीमधील कामाची व्यवस्था कशी चालते हे सर्वसामान्यांनाही माहीत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमपी अध्यक्षा गुंडे म्हणाल्या, महिलादिनी खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेला महिलांचा चांगला प्रतीसाद मिळत आहे. त्यानुसार इतर मार्गावरही तेजस्विनी बससेवा सुरू करण्याची मागणी महिला प्रवासी करत आहेत. मात्र, उपलब्ध बसेसनुसार त्या सोडल्या जात असून यापुढील काळात बसची संख्या वाढल्यास इतर मार्गावर सोडण्याचा विचार करण्यात येईल. विधी अधिकारी निता भरमकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)