पीएमपी बसमधून सव्वादोन लाखांची चोरी

पिंपरी – पीएमपीएमएल बसमधील प्रवासादरम्यान महिलेचे सव्वादोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान काळेवाडी फाटा ते पी एन गाडगीळ ज्वेलर्स चिंचवडगाव या मार्गावर घडली. जयश्री सुनील ढमक (वय 37, रा. थेरगाव, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री ढमक या काळेवाडी फाटा येथून चिंचवड गावात येत होत्या. त्या काळेवाडी फाटा बस स्टॉपवरून पीएमपीएमएल बसमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास बसल्या. चिंचवड गाव येथील पी एन गाडगीळ ज्वेलर्स दुकानाजवळ उतरल्या. उतरल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोने-चांदीचे दागिने गायब झाल्याचे समजले. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या पर्समधील पैशांचीही चोरी झाली होत. एकूण 2 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने बस प्रवासादरम्यान चोरून नेला आहे. शुक्रवारी देखील काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी या मार्गावर प्रवास करत असताना 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. त्यामुऴे शहरात प्रवासादरम्यान चोरीचे प्रमाण पाहता पोलिसांना सोनसाखळी चोरीप्रमाणे आता या नवीन चोरीच्या प्रकाराकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. या दोन्ही घटनांचा तपास वाकड पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)