“पीएमपी’ अध्यक्षांना महापौरांची “तंबी’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने “पीएमपीएमएल’करिता 200 बस खरेदीचा प्रस्ताव उद्या (दि.6) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीकरिता ठेवण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी या सभेला “पीएमपीएमएल’च्या अध्यक्षा नयना गुंडे स्वत: उपस्थित राहिल्या नाहीत, तर बस खरेदीचा प्रस्ताव फेटाळण्याचा इशारा महापौर राहुल जाधव यांनी दिला आहे. गुंडे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधत हा इशारा दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा “पीएमपीएमएल’मध्ये 40 टक्के हिस्सा आहे. त्याप्रमाणात पीएमपीएमएला आर्थिक मदत केली जाते. मात्र, पुर्वाश्रमीच्या पीसीएमटी कर्मचाऱ्यांना सापत्न भावाची वागणूक व निधीच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात सोडल्या जाणाऱ्या बसची संख्या अपुरी. याबाबत लोकप्रतिनिधींची अनेक वर्षे तक्रार आहे. मात्र, पीएमपीएमएल प्रशासनाकडून या गांभीर्याने दखल गेली जात नाही. वारंवार बोलावून एकही जबाबदार अधिकारी सभेला उपस्थित राहत नाही.

दरम्यान, “पीएमपीएमएल’करिता एकूण 1 हजार 550 बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यापैकी स्थायी समितीने 200 बस खरेदीस यापुर्वीच मान्यता दिली असून, सर्वसाधारण सभेच्या मान्यतेकरिता हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बुधवारी (दि.5) झालेल्या साप्ताहिक बैठकीत “पीएमपीएमएल’च्या अनागोंदी कारभारावर सडकून टीका करण्यात आली. आर्थिक तोटा असल्याचे कारण दाखवत लोकप्रतिनिधींना याची कल्पना न देताच शहरातील अनेक मार्ग अचानकपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)