पीएमपीला 204 कोटींची मिळणार संचलन तूट

स्थायी समितीची मान्यता : 2017-18 मध्ये 5 कोटींचा नफा

पुणे – पीएमपीएमएलला 2017-18 या आर्थिक वर्षाच्या संचलनतुटीपोटी सुमारे 204 कोटी रुपये देण्यास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2016-17 मध्ये ही तूट 210 कोटींची होती. मात्र, पीएमपीच्या ताफ्यात स्वत:च्या बसेस वाढल्याने ही तूट 5 कोटींनी कमी झाली आहे. या संचलन तूटीचा लेखापरीक्षण अहवाल स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता, अशी माहिती समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य शासनाच्या आदेशानुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पीएमपीला दरवर्षी संचलन तूट दिली जाते. या कंपनीत पुणे महापालिकेचा 60 टक्‍के, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेस 40 टक्‍के तूट देणे बंधनकारक आहे. त्यानुसार, दरवर्षी हा संचलन तूटीचा अहवाल पीएमपीकडून महापालिकेस सादर केला जातो. त्यानंतर पालिकेच्या लेखापरीक्षण विभागाकडून हा अहवाल तपासून तो स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्यास अखेर समितीने मान्यता दिली असून ही तूट 12 समान हप्त्यांमध्ये पीएमपीला दिली जाणार असल्याचे मुळीक यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, या तूटीतील 122 कोटी 77 लाख रुपये पुणे महापालिका, तर 81 कोटी 84 लाख रुपये पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे.

ठेकेदारांचा खर्च कमी होण्यास सुरुवात
या वर्षात पीएमपीकडून “मिडी बस’ तसेच “तेजस्विनी’ बस संचलनात आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीएमपीकडील ठेकेदारांच्या बसेसचे संचलन कमी झाले आहे. 2016-17 मध्ये ठेकेदारांच्या बसेससाठी पीएमपीने 260 कोटींचा खर्च केला होता. हा खर्च नवीन बसेसमुळे 2017-18 मध्ये तब्बल 40 कोटींनी कमी झाला असून या वर्षात हा खर्च 220 कोटींवर आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)