पीएमपीला देणार 7. 37 कोटी रुपये

File Photo

प्रस्तावाला मुख्यसभेची मंजुरी


कारभारावर सदस्यांचा आक्षेप

पुणे – पीएमपीएमएलला सात कोटी 37 लाख 30 हजार 405 रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिका मुख्यसभेत सोमवारी मंजूर करण्यात आला. नेहमीप्रमाणे सदस्यांनी पीएमपीएमएलच्या कारभारावर आक्षेप घेतला मात्र, उत्तरे देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने पीएमपीएमएलची खास सभा बोलावण्यात येईल, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी सभागृहात दिले.

सन 2016-17 या वर्षांत वितरित केलेल्या मोफत-सवलतीच्या बसपासपोटी 27 कोटी 37 लाख 30 हजार 405 रुपये महापालिका पीएमपीएमएलला देणे आहे. त्यातील 20 कोटी रुपये पीएमपीएमने उचल घेतली आहे. त्यामुळे अन्य सात कोटी 37 लाख 30 हजार 405 रुपये महापालिकेने अदा करावेत, यासंदर्भातील ठराव महापालिका मुख्यसभेपुढे सोमवारी मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी सदस्यांनी नेहमीप्रमाणे पीएमपीएमएलच्या कारभाराला लक्ष्य केले.

वित्त विभागाचे अधिकारी महापालिका सभेत उपस्थित होते. त्यांच्याच कामकाजावर सदस्यांनी प्रश्‍न विचारण्याला सुरूवात केली. एसटीच्या सेवेतील पाच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन देऊन पीएमपीएमएलच्या कामात सहभागी करून घेतले आहे. त्या कर्मचाऱ्यांवर एसटी विभागात चौकशी सुरू आहे. असे असतानाही त्यांना 60 हजार रुपये पगार देऊन का सामावून घेतले, असा मुद्दा अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. संचालक म्हणून महापौरांनी याची माहिती मागवली पाहिजे, असे ते म्हणाले. यावर याची माहिती मागवली जाईल, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.

माजी सदस्यांना वैद्यकीय सेवा योजना
पीएमपीएमएल मधील कर्मचारी, सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त सेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना राबवण्याबरोबरच पीएमपीएमएलच्या माजी सदस्यांनाही वैद्यकीय सेवा योजनांचा लाभ देण्यात यावा ही उपसूचना सोमवारी महापालिका मुख्यसभेत मंजूर करण्यात आली. यामुळे सर्वच सदस्यांना याचा लाभ मिळणार आहे. सेवकांना सीएचएस चे सगळे नियम आधीपासूनच लागू आहेत. यामध्ये त्या सेवकाचा मुलगा 25 वर्षांचा होईपर्यंत त्याला लाभ मिळणार असल्याचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सभागृहात सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)