पीएमपीला “एआरएआय’, “सीआयआरटी’ची मदत

आगीचे कारण शोधण्यासाठी संयुक्त काम


आरटीओ प्रशासनाचीही घेण्यात येणार मदत

पुणे – पीएमपी बसेस सातत्याने आग लागून त्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. याची कारणे शोधून त्यावर उपायासाठी पीएमपी प्रशासन संयुक्तपणे काम करणार आहे. यासाठी वाहन उद्योगातील महत्त्वपूर्ण संस्था ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) या संस्थेसह आरटीओ प्रशासनाचीही मदत घेण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून पीएमपीला आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. एप्रिल 2016 पासून आजपर्यंत तब्बल 21 बसेस विविध कारणांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. गेल्या आठवड्यातही नगर रस्त्यावर धावत्या बसला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत पीएमपी बस पूर्णतः जळून खाक झाली. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी प्रशासन खडबडून जागे झाले असून आगीची कारणे शोधण्यासाठी संयुक्तपणे अभ्यास करण्याचे ठरवण्यात आले आहे. यासाठी एआरएआय, सीआयआरटी, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), टाटा कंपनी यांच्यासह बैठक घेतली जाणार आहे. यापूर्वी “सीआयआरटी’ संस्थेची मदत घेण्यात आली होती. मात्र, आता “एआरएआय’ या संस्थेचीही मदत घेण्यात येणार आहे. या सदस्यांकडून पुढील काही दिवस पीएमपी बसेसची पाहणी, वेगवेगळ्या बसेसचा अभ्यास करुन आग लागण्याची कारणे शोधण्यात येणार आहेत. यानंतर यावर काय उपाय करणे गरजेचे आहे? याविषयी सदस्यांकडून सुचवण्यात येणार आहे. यावर पीएमपीकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सेफ्टी ऑडिटसाठी संस्था मिळेना
आगींच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर यापूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. अभ्यासांती या समितीने बसेसचे फायर ऍन्ड सेफ्टी ऑडिट करण्याचे पीएमपी प्रशासनाला सांगितले होते. त्यानुसार पीएमपीकडून सेफ्टी ऑडिटसाठी प्रयत्नही झाले. मात्र, बसेसचे सेफ्टी ऑडिट करुन देणारी संस्था उपलब्ध न झाल्याने हे काम होऊ शकले नाही. दरम्यान, यानंतर सर्व बसेसमध्ये अग्निशमनविरोधी यंत्रणा बसवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)