पीएमपीमध्ये पाकीटमार करणाऱ्या चोरट्याला अटक

पुणे, दि. 12 (प्रतिनिधी) – पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशांचे पाकीट लांबवणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने स्वारगेट परिसरात सापळा रचून अटक केली.त्याच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तपासात त्याच्याकडून एक लाख 18 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरोड्याच्या तयारीत असताना स्वारगेट पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. राजु नारायण जाधव (वय 24, रा. राजीवगांधीनगर, बिबवेवाडी, मूळगांव फुलाम्बरी, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या पाकीटमाराचे नांव आहे. जाधव हा स्वारगेट परिसरात येणार असल्याची माहिती हवालदार अनिल घाडगे यांना मिळाली. त्यावरून युनिट तीनच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने स्वारगेट, शिवाजीनगर, चतुःश्रृंगी, बंडगार्डन परिसरात बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे पाकीट चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त सुरेश भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम मोरे, सहायक निरीक्षक रविंद्र बाबर, अनिल घाडगे, गुणशिलन रंगम, गजानन गाणबोटे, महेंद्र पवार, शिवानंद स्वामी, सुधीर सोनवणे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)